बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत दादा कोंडुसकर यांचा उमेदवारी अर्ज उद्या दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भरण्यात येणार आहे.
आंबेडकर भवन येथून सुरू होऊन आरटीओ सर्कल सोन्या मारुती मंदिरपासून भव्य मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तरी दक्षिण मतदारसंघातील अजी-माजी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तालुका पंचायत, जिल्ह्या पंचायत सदस्य, महिला मंडळे, युवक मंडळे, भजनी मंडळे व समिती कार्यकर्त्यांनी भगवे फेटे, भगवी टोपी परिधान करून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta