खानापूर : शहरात पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. येथील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने ९७ वी शिवजयंती ज्ञानेश्वर मंदिरात साजरी करण्यात येणार आहे. शनिवार दि. २२ रोजी दुपारी १२ वा. शिवजन्म सोहळा तर सायंकाळी ५ वा. पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवस्मारक ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवस्मारकात सकाळी १० वा. शिवपुतळ्याचे पूजन करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, यावर्षी निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दि. २२ मे रोजी भव्य प्रमाणात चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. लक्ष्मी मंदिर येथे युवक मंडळाच्यावतीने शिवपूजन करण्यात येणार आहे. भगवा रक्षक चव्हाटा युवक संघ, रवळनाथ युवक संघ यांच्यावतीने शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
बसवजयंती
बाजारपेठ येथील बसवेश्वर मंदिरात प्रथेप्रमाणे शनिवार दि. २२ रोजी बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येणार आहे. सकाळी नामकरण सोहळा तर सायंकाळी ५ वा. बसवेश्वर महाराजांची पालखी शहरातील ठरलेल्या मार्गांवरून सवाद्य मिरवणुकीने काढण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta