बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावातून बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचा प्रचार व पदयात्रेचा शुभारंभ रविवार दि. 23 रोजी सायंकाळी 5 वा. करण्यात येणार आहे.
येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी देवीला राखणीचा नारळ ठेऊन कोंडुसकर यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर संपूर्ण येळ्ळूर गावात पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधण्यात येणार आहे.
तरी येळ्ळूर गावातील म. ए. समितीचे कार्यकर्ते, युवक मंडळे व महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता चांगळेश्वरी मंदिर येथे वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta