Thursday , March 5 2026
Breaking News

आर. एम. चौगुले यांच्या झंझावाती प्रचारास सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचार दौऱ्याची आज सुरुवात झाली असून बाकनूर, बेलवट्टी, इ. बडस, कावळेवाडी, बिजगर्णी गावांत जोरदार प्रचार करण्यात आला.
यावेळी सदर गावातून आर. एम. चौगुले यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला.

प्रारंभी सकाळी ठीक ७ वा. बाकनूर येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन केल्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली. बाकनूर गावातील गल्लोगल्ली प्रचार फेरी काढून मराठी भाषा, सीमाप्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनाच आगामी निवडणुकीत मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी आर. एम. चौगुले यांचे गल्लोगल्ली औक्षण करून स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी, माय बोली मराठीच्या रक्षणासाठी या निवडणुकीत आर. एम. चौगुले प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यानंतर इनाम बडस, बेळवट्टी, कावळेवाडी, बिजगर्णी गावांमध्येही गल्लोगल्ली प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीलाही लक्षणीय प्रतिसाद लाभला.
शेवटी बिजगर्णी ब्रम्हलिंग मंदिर येथे सभा घेऊन या प्रचाराची सांगता करण्यात आली.
या प्रचार फेरीसाठी आर. एम. चौगुले यांच्यासमवेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, एपीएमसी सदस्य आप्पा जाधव, सुरेश राजूकर, निंगापा मोरे, वसंत अष्टेकर, बी एस पाटील, मनोहर होसुरकर, ग्राम पंचायत अध्यक्ष, म्हाळू मजुकर, ज्ञानेश्वर चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य नारायण नलवडे, भुजंग गाडेकर, सातेरी चौगुले, गुंडू बडसकर, ओमानी भोगण, बी बी देसाई, विनोद कांबळे, प्रकाश बेळगुंदकर, भाऊ तुडयेकर, अशोक चौगुले, प्रकाश सुतार, नारायण पाटील, सदु पाटील, रामू पाटील, नारायण पाटील, जोतीबा राऊत, रवळू राऊत, विठ्ठल पाटील, के एन पाटील,
यांच्यासह तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *