बेळगाव : आज दि. २१ एप्रिल रोजी बेळगाव उत्तर मतदारसंघाची निवडणूक नियोजन बैठक रामलिंग खिंड गल्ली येथील उत्तर मतदार संघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयात घेण्यात आली. सदर बैठकीत प्रचार मार्ग, प्रचार सभा तसेच विविध कमिटी स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उत्तर मतदार संघातील सर्व आजी- माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि निवड कमिटी सदस्यांना बोलवण्यात आले होते आणि त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. उत्तर मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीला यावेळी चांगली संधी तयार झाली असून या मतदार संघावर महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा रोवण्यासाठी सर्वांनी जोरात काम करण्याचा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे होते. यावेळी उत्तर मतदार संघाचे समितीचे अधिकृत उमेदवार श्री. अमर येळ्ळूरकर यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकदीनिशी कार्य केले पाहिजे असे ठरविण्यात आले. तसेच दिनांक २२ रोजी उत्तर मतदार संघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ठीक ६ वाजता करणार असल्याचे नियोजन देखील करण्यात आले. या बैठकीत समिती नेते प्रकाश मरगाळे, युवा समितीचे शुभम शेळके, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोलकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, गणेश ओउळकर, माजी नगरसेवक वैशाली हुलजी, विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर, मोतेश बारदेशकर आदींनी आपले विचार मांडले. या बैठकीला माजी महापौर संज्योत बांदेकर विद्यमान नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी नगरसेविका मीना वाझ, प्रभावती गवळी, मीनाक्षी चीगरे, ज्योती चोपडे, माया कडोलकर, रेणू मुतकेकर, किशोरी कुरणे, रेणू मोरे, तसेच रणजित चव्हाण, गजानन पाटील, सुनील बालेकुंद्री, बसवंत हलगेकर, विजय बोंगाळे, अजित कोकणे, अनिल पाटील, अनिल धामणेकर यांच्यासह उत्तर मतदार संघातील अनेक मान्यवर वा युवा कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पियूष हावळ यांनी केले व रणजित चव्हाण यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta