
बेळगाव : छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, आनंद नगर दुसरा क्रॉस वडगाव बेळगावच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवार दि. २३ रोजी सायंकाळी महाप्रसाद उत्साहात संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज पवार होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीचे पूजन येथील प्रसिद्ध बिल्डिंग डेव्हलपर अनिल कुकडोळकर यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते वेदांत को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन संदीप खन्नूकर व निवृत्त प्राध्यापक बळीराम कानशिडे हे होते. या प्रसंगी संदीप खन्नूकर यांनी शिवरायांचे विचार आणि त्यांचे पराक्रम याबद्दल आपले विचार मांडले. उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे कौतुक केले.
शिवजयंती निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रवण कुमार जांगिड, वीरेंद्र हेगडे, सचिन जाधव, व्यंकटेश शेठ, सचिन पाटील, कृष्णा तुळजाई, पी ए पाटील, बबन कानशिडे, किरण कणबरकर, आप्पाजी कुगजी, सिताराम वेसने, चंद्रकांत धुडुम, आदी मान्यवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज पवार, मल्लाप्पा कुंडेकर, बाळू तमुचे, महेश सुभेदार, महेश करटे, संतोष पवार, नाना कोकरे, सुनील दंडकल तसेच इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta