बेळगाव : विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज सोमवारी अंतिम दिवस होता. त्यानुसार दुपारी दिलेल्या निर्धारित वेळेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 47 जणांनी आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे.
यापूर्वी जिल्ह्यातून 360 उमेदवारी अर्ज 13 ते 20 एप्रिल दरम्यान दाखल झाले होते. त्यापैकी 25 अर्ज हे छाननीत अवैध ठरले होते. त्यानंतर आता उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 47 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta