Thursday , March 5 2026
Breaking News

समितीमय वातावरण; आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्याचा निर्धार!

Spread the love

 

कंग्राळी बुद्रुक : बेळगांव ग्रामीणमधील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा कंग्राळी बुद्रुक भागात झंझावाती प्रचार फेरी काढण्यात आली. या भागातील समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आपला एकमुखी पाठिंबा दर्शविला आणि आर. एम. चौगुले यांना भरगोस मतांनी विजयी करून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कंग्राळी बुद्रुक गांव समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यापूर्वीही या गावाने समितीला भरघोस मतदान करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली.

आर. एम. चौगुले यांचे आगमन होताच त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

रामनगर, शास्त्रीनगर, संभाजीनगर, मरगाईनगर, मसनाई गल्ली, चव्हाट गल्ली, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, नेताजी गल्ली व इतर भागात फिरून आर. एम. चौगुले यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले.

शेवटी झालेल्या कोपरा सभेत आर. एम. चौगुले यांनी १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकाने १००% मतदान करून घेण्यासाठी कामाला लागावे असे सांगून उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष यलोजी पाटील यांनी गावच्या वतीने पाठिंबा जाहीर केला.

तसेच अमोल पाटील, शंकर पाटील, शंकर कामी, ऍड. सुधीर चव्हाण यांनी पाठिंबा व्यक्त करणारी भाषणे केली.

सदानंद चव्हाण यांनी आभार मानले.

प्रचार फेरी पदयात्रेत शेकडो माता भगिनी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *