Thursday , March 5 2026
Breaking News

ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ उद्या मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ठीक ८ वाजता कपिलेश्वर मंदिर परिसर येथून होणार आहे. सुरवातीला कपिलेश्वर मंदिर येथे श्री कपिलनाथाचे विधिवत पूजन करून प्रचाराला सुरवात केली जाईल व पुढे मार्गक्रमण करत कपिलेश्वर रोड, तंगडी गल्ली, रामामेस्त्री अड्डा, महाद्वार रोड, संभाजी गल्ली, पहिला क्रॉस, मराठा गल्ली निम्मा भाग, तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली, कांगले गल्ली, पाटील गल्ली, पाटील मळा आणि शनी मंदिर परिसर येथे प्रचार फेरी समाप्त होईल. संध्याकाळी ५ वाजता फुलबाग गल्ली येथील सावंत बिल्डिंग पासून सुरवात होईल व संपूर्ण फुलबाग गल्ली, मुजावर गल्ली, शिवाजी रोड, कोनवाळ गल्ली येथून टिळक चौक याठिकाणी समाप्त होईल. तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित राहून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांना निवडून आणण्यासाठी संघटित व्हावे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *