बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघातील कपिलेश्वर रोड, भांदूर गल्ली, तशिलदार गल्ली, तानाजी गल्ली आदी भागातील महिला मंडळांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. मंगळवारी सुरू होणाऱ्या प्रचार फेरीच्या पूर्वार्थ महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. रेणू किल्लेकर व माजी महापौर सरिता पाटील, विद्यमान नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी नगरसेविका वैशाली हुलजी यांच्या सोबत समितीच्या इतर महिला प्रतिनिधींनी वयक्तिक भेटीगाठी घेवुन जास्तीत जात लोक व खासकरून महिलांनी श्री. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ सामील व्हावेत यासाठी परिश्रम घेतले. भागातील अनेक महिला मंडळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना भगोस मतांनी निवडून देण्याचा यावेळी निर्धार केला.
Belgaum Varta Belgaum Varta