शास्त्रीनगर, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड, न्यू गुडशेठ रोड विविध सर्व मंडळांनी फलकावर लिहून पाठिंबा दर्शविला : सर्वत्र भगवेमय वातावरण

बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झालेला असून मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता शास्त्रीनगर न्यू गुडशेठ रोड महात्मा फुले रोड एसपीएम रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. आणि येथील सर्व मंडळांनी फलकावर लिहून पाठिंबा दर्शविला.

प्रारंभी नर्तकी सिनेमागृहासमोरील न्यू गुड शेठ रोड या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे दक्षिणचे अधिकृत उमेदवार समाजसेवक श्री. रमाकांत कोंडुसकर यांचा सत्कार विविध सर्व मंडळांच्या वतीने व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. वेंकटेश शहापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रोपट्याला पाणी घालून आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी एक विशेष पदयात्रेमध्ये जागृती करण्यात आली. निवडणुकीच्या पदयात्रेला मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी अरुण काळे, सुरेश मळीक, गोपाळराव हंडे, गणेश दड्डीकर, सुनील राव, विकास पाटील , कपिल भोसले, विजय बेळगावकर, सुधीर गोडसे, अर्जुन पाटील यांच्या हस्ते श्री. रमाकांत कोंडुसकर यांचा सन्मान करण्यात आला.
पदयात्रेला न्यु गुडशेठ रोडहून होऊन प्रारंभ झाला. त्यानंतर न्यू गुडशेठ रोड, शास्त्रीनगर सहावा क्रॉस पाटीदार भवन, संत सेना भवन, हुलबत्ते कॉलनी, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड यासह विविध भागात गलोगल्ली श्री. रमाकांत कोंडुसकर यांचे स्वागत करण्यात आले आणि मोठ्या जल्लोषात मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली “महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो” यासह वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. सर्वत्र भगवे फेटे, भगवे झेंडे संपूर्ण वातावरणात भगवेमय करून सोडले होते. गल्लो गल्ली घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या आणि फटाकांच्या आतषबाजीत जल्लोषात सर्वत्र स्वागत करून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला.
यावेळी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, एसपीएम रोड, न्यू गुड्स रोड, महात्मा फुले रोड गणेशोत्सव मंडळ, शास्त्रीनगर आठले गुरुजी गणेशोत्सव मंडळ, लालबहादूर शास्त्री गणेशोत्सव मंडळ शास्त्रीनगर, शिवजयंती उत्सव मंडळ, गोडसे कॉलनी, शास्त्रीनगर यांच्या वतीने गल्लोगल्ली मध्ये असणाऱ्या सार्वजनिक फलकावर लिहून श्री. रमाकांत कोंडुसकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक सुधा भातकांडे, माजी नगरसेवक अनिल पाटील, माया पाटील, महेश दड्डीकर, सुरेश मळीक, सागर पाटील, विशाल कंग्राळकर, चंद्रकांत कोंडुसकर , अवधूत पाटील, गजानन भोसले, प्रा. एन. एम. शिंदे, अरविंद घाटगे, मनोहर देसाई, बंडू देसाई, उमेश पाटील, आनंद आपटेकर, शंकर भातखंडे, सदा शिनोळकर, अरुण काळे, विनोद हंगरेकर, सचिन पाटील, प्रवीण पाटील, भरत नागरोळी, कपिल पाटील , कपिल भोसले यासह परिसरातील पंचमंडळी, महिला मंडळ, युवक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta