बेळगाव : महाराष्ट्रामध्ये आम्ही कन्नड मराठी दुजाभाव कधीच करीत नाही. मात्र बेळगावमध्ये मराठी भाषा संपवण्याचे षडयंत्र सरकारने रचले आहे. आमदार अनिल बेनके साहेब राष्ट्रीय पक्षात राहून मराठी माणसावर होणारा अन्याय तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावा लागत आहे. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर रहा, अशी साद राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
बेळगाव शहर तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर यळ्ळूरकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ चव्हाट गल्ली येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
रोहित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये आम्ही कन्नड- मराठी दुजाभाव कधीच करत नाही. मात्र बेळगावमध्ये मराठी भाषा संपवण्याचे षडयंत्र सरकारने रचले आहे. या मोठ्या शक्तीविरुद्ध आपण लढायचे आहे. बेळगावमध्ये आलो की, मला महाराष्ट्रातच आल्यासारखे वाटते… कारण बेळगाव हे माझ्या आत्याचे गाव आहे. सीमाभाग
महाराष्ट्रात विलीन व्हावा, यासाठी सीमा चळवळ महाराष्ट्र एकीकरण समितीने सुरू ठेवली आहे. त्या लढ्याला बळ देण्याचे काम आपण करू शकतो. त्यासाठी यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवावे.
सभेला उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर, म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, मालोजी अष्टेकर, सरिता पाटील, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta