Wednesday , December 10 2025
Breaking News

रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ विविध भागात होणार प्रचार

Spread the love

 

बेळगाव : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. म. ए. समितीचे दक्षिण मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचा येत्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी जोरदार प्रचार करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. मंगळवारी मजगाव येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे. मंगळवारी व बुधवारी महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या सभादेखील होणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे चिरंजीव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पाटील यांची सभा मंगळवारी संध्याकाळी मच्छे येथे होणार आहे. तर खादरवाडी, येथे प्रा. मधुकर पाटील यांची प्रचारसभा होणार आहे. त्यामुळे या सभांकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
मंगळवारी मजगाव येथे रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता मजगाव गावच्या वेशीतून पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
त्यानंतर मजगावमधील सर्व गल्ल्या परिसरातील लोकप्रतिनिधी, पंचमंडळी फिरून ज्ञानेश्वरनगर, कलमेश्वरनगर,
रोहिदास कॉलनी, रायण्णानगर, राजारामनगर, देवेंद्रनगर, महावीरनगर, ब्रह्मनगर परिसरात प्रचारफेरीची सांगता होणार आहे. तरी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंचमंडळी, युवक मंडळे, महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
बुधवार दि. ३ मे रोजी सकाळी ७ वाजता भाग्यनगर परिसरात प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. अनगोळ नाका येथून प्रचारफेरीला प्रारंभ होणार आहे. चिदंबरनगर, भाग्यनगरमधील सर्व क्रॉस फिरून सांगता होणार आहे. या पदयात्रेमध्ये परिसरातील लोकप्रतिनिधी, पंचमंडळी आणि महिला मंडळांनी उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

खादरवाडी, पिरनवाडीतही सभा

प्रा. मधुकर पाटील यांची जाहीर सभा मंगळवारी खादरवाडी आणि पिरनवाडी येथे होणार आहे. सायंकाळी ६ वाजता खादरवाडी येथे तर रात्री ८ वाजता पिरनवाडी येथील भाजी मार्केटशेजारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मच्छे येथे रोहित पाटील यांची जाहीर सभा संध्याकाळी होणार आहे. जिजामाता चौक, गणपत गल्ली येथे सायंकाळी ७ वाजता ही सभा होणार असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *