
बेळगाव : दिनांक 2 मे रोजी सकाळी बेळगाव उत्तर मतदारसंघातील विजयनगर, विनायक नगर, बुडा स्किन नंबर 51 या भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. श्री. अमर येळूरकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली. मराठी बहुलभाग असणाऱ्या या भागातून नागरिकांनी अमर येळूरकर यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला भागातील अनेक घरांमध्ये येळूरकर यांचे हार घालून आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. अनेक वर्षानंतर मराठी आमदार निवडून देण्याची संधी यावेळी मिळाल्यामुळे मराठी लोकांमधून आनंदाचे वातावरण होते. प्रत्येक ठिकाणी यावेळी समितीलाच मतदान करण्याचा निर्धार लोकांनी बोलून दाखवला या भागातील पाईपलाईन रोड, विनायक नगर, गुलमोहर कॉलनी, बुडा स्कीम नंबर 51 आधी भागातील बहुसंख्य मराठी नागरिक ऍड. अमर येळूरकर यांच्या प्रचार फेरीमध्ये दाखल झाले होते. यावेळी बाळू पाटील, परशराम आजरेकर, डी बी पाटील, रवी तरळे, शिवाजी बाडीवाले, सावंत, बाळू दफेदार, पियुष हावळ, राजश्री हावळ, अजित जाधव, मरुचे, सुरेश पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta