बेळगाव : बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षपदी राम भंडारे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी भारत देशपांडे आणि सचिवपदी विलास बदामी यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी आरएस कुलकर्णी आणि संयुक्त सचिव पदी विलास जोशी यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. उद्यमबाग येथील सेलेब्रेशन्स हॉल या ठिकाणी या समाजाचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्याकरिता संघटनेने काही ध्येयधोरणे निश्चित केली असल्याचे कळविण्यात आले आहे. या संघटनेची ध्येय आणि उद्दिष्टे;
1) समाजाची एकता, प्रगती आणि उन्नतीसाठी प्रयत्न करणे.
2) सामाजिक-आर्थिक समुदाय विकासाच्या सर्वांगीण सुधारणांना पाठिंबा.
3) विद्यार्थ्यांना बक्षिसे, शिष्यवृत्ती इत्यादी मार्गाने आर्थिक मदत देऊन तांत्रिक, वैद्यकीय आणि सार्वजनिक सेवा परीक्षांसारख्या त्यांच्या अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे.
4) उद्योग किंवा कोणताही व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यासाठी आमच्या समुदायातील लोकांना पाठिंबा देणे.
5) महिला सक्षमीकरणाला पाठिंबा द्या.
6) कौशल्य विकास केंद्रे आणि संशोधन आणि विकास केंद्रे आणि स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहन आणि समर्थन करणे.
Belgaum Varta Belgaum Varta