बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 7 मे रोजी टिळकवाडीतील उर्वरित भागात पदयात्रा व सभेचे
आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 5 वाजता पदयात्रेचा प्रारंभ म. गांधी रोड येथील सिद्धिविनायक मंदिरपासून होणार आहे. त्यानंतर महर्षी रोड, चौगुलेवाडी, द्वारका नगर, अयोध्या नगर व गोडसेवाडी या भागात फिरून पदयात्रेचे सभेत रूपांतर होईल. यावेळी जयंत पाटील हे मार्गदर्शन करतील तर उमेदवार रमाकांत कोंडुसकर हे मतदारांचा आशिर्वाद मागतील.
पदयात्रेत व सभेस या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta