
बेळगाव : विधानसभा निवडणूक जाहीर प्रचाराची आज सोमवारी काही वेळातच सांगता होत असताना, जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी नितेश पाटील यांनी बुधवारी होणारी मतदान आणि मतमोजणी व्यवस्थेबाबत माध्यमांना माहिती दिली.
आज सायंकाळी आर पी डी कॉलेज येथील मतमोजणी मीडिया सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद बोलताना नितेश पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात 39 लाख 47 हजार मतदार बुधवारी मतदान करणार आहेत. मतदानासाठी जिल्ह्यात 4434 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 19 लाख 90 हजार 865 पुरुष, 19 लाख 56 हजार 143 महिला तर 151 तृतीयपंथी मतदार मतदानात भाग घेणार आहेत.यावेळी प्रथमच 94 हजार 652 तरुण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. ईव्हीएम मशीन आणि अधिकाऱ्यांना ये-जा करण्यासाठी 1000 बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 13 तारखेला सकाळी आठ वाजता आरपीडी महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल. सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी होईल. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएम मशीन मतमोजणीला सुरुवात होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta