बेळगाव : भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला वयाच्या 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिलेला आहे. तो हक्क बजावत असताना मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. कालच कर्नाटकात विधानसभा निवडणुका पार पडल्या. मात्र बरेच मतदार या निवडणूक ओळखपत्रापासून वंचित राहिलेले आहेत. नवीन मतदार ओळखपत्र किंवा मतदान ओळखपत्रावरील दुरुस्तीसाठी पुन्हा मागविण्यात आलेले मतदार ओळखपत्र हे निवडणुकीपूर्वी मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. मात्र सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे मतदारांना निवडणूक झालेल्या दुसऱ्या दिवशी पोस्ट खात्याकडून निवडणूक ओळखपत्र घरपोच दिले गेले आहेत त्यामुळे बऱ्याच नवीन मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही त्यामुळे मतदारात नाराजी पसरलेली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta