Wednesday , December 10 2025
Breaking News

विश्वभारती मॅरेथॉन स्पर्धा 4 जून रोजी बेळगावात

Spread the love

 

बेळगाव : विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून ठेवण्यात येणाऱ्या मॅरेथॉन बद्दल खानापूर येथे बैठक भरवण्यात आली होती. या ठिकाणी झालेल्या चर्चेत येणाऱ्या ४ जून रोजी होणाऱ्या मॅरेथॉनबद्दल चर्चा करण्यात आली. कारगिल येथील जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने व माजी सैनिकांच्या आग्रहाखातर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे येथील शरहरद फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी 16 सप्टेंबरला गेली पाच वर्ष ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा विश्वभारती कला क्रीडा संघटनेने आयोजित केली आहे.
या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना कारगिल येथील 16 सप्टेंबर 2023 या कारगिल मॅरेथॉनमध्ये सहभाग होण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा 4 जून 23 रोजी बेळगाव येथे पहिल्यांदाच आयोजित केली आहे. या सर्व विजयी उमेदवारांना आकर्षक बक्षिसे व त्यांना कोचिंग मिळण्याची संधी संघटनेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे्.
तरी या संधीचा सर्व खेळाडूंनी उपयोग करून घ्यावा ही विनंती आहे.
स्पर्धेचे अटी व नियम.
1) फुल मॅरेथॉन 42.195 किलोमीटर अंतराची असेल
खुल्या गटासाठी वयोमर्यादा 18 वर्षावरीलत प्रवेश फी प्रत्येकी 700 रुपये
2) हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर अंतराची असेल
पुरुष व महिला गट 18 वर्षांवरील
प्रवेश फी 600 रुपये
3) दहा किलोमीटर पुरुष व महिला गटासाठी 18 वर्षावरील
प्रवेश फी 500 रुपये

4) दहा किलोमीटर अंतर पुरुष व महिला गट वयोमर्यादा 35 वर्षावरील प्रवेश फी 500 रुपये

5) ड्रीम मॅरेथॉन सर्वांसाठी खुली
स्पर्धा प्रवेश फी 300 रुपये
स्पर्धकासाठी प्रवेश प्रक्रिया
1. मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक
2. आधार कार्ड आवश्यक
3. डिजिटल पेमेंट ची सुविधा.
Contact For More Information – 9591451091

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *