बेळगाव : बेळगावात पुन्हा एकाचा खून झाल्याची घटना रात्री घडली आहे. बेळगाव तालुक्यातील मारीहाळ गावात गुरुवारी रात्री एका युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. मारीहाळ गावातील महंतेश रुद्रप्पा करलिंगन्नावर (23) या तरुणाची चार-पाच तरुणांनी हत्या केली. हत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समजते.
गुन्हे शाखेचे डीसीपी पी.व्ही. स्नेहा व मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी मारीहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta