Thursday , March 5 2026
Breaking News

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार दिनांक 26 रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओवरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीमध्ये एक जून 1986 मधील कन्नड सक्तीतील हुतात्म्यांना अभिवादन तसेच विधानसभा निवडणुकीतील चिंतन बैठक व अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विधानसभा निवडणुकीतील निवड कमिटी सदस्यांनी,युवा आघाडीचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *