Thursday , March 5 2026
Breaking News

लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपदासह डबल लाॅटरी; झाल्या आजी!

Spread the love

 

बेळगाव : दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज शनिवारी होणार आहे. आज 24 जणांची यादी निश्चित झाली असून बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह 24 आमदारांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मंत्रीपदी नियुक्ती झाल्यामुळे आनंदी असलेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे, ती म्हणजे त्यांची नात म्हणजेच ‘महालक्ष्मी’ हिचे घरी आगमन झालयं. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. शपथ घेताना आनंदी असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांना आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर मंत्रीपद मिळाल्या दिवशी आजी झाल्या.

लक्ष्मी हेब्बाळकर यांची सून डाॅ. हिता मृणाल हेब्बाळकर हिने एका मुलीला जन्म दिला आहे. 26 मे च्या रात्री शिमोगा येथील एका खाजगी रुग्णालयात एका मुलीचा जन्म झाला. मुलगा मृणाल आणि सून हिता यांना मुलगी झाल्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांना खूप आनंद झाला आहे. शपथविधी समारंभानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कुटुंबीय थेट बेंगळुरूहून शिमोगाला जाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *