बेळगाव : बेळगावकरांची शिवभक्ती, बेळगावकरांचे हिंदूत्व आणि शिवभक्तांचे भगव्यावरील प्रेम जगजाहीर आहे. बेळगावात छत्रपती शिवराय आणि भगव्याच्या बाबतीत उत्तुंग प्रेम निष्ठा आणि स्वाभिमान पहायला मिळतो अन् त्याची झलक रविवारच्या पावसात पाहायला मिळाली. कोरे गल्ली कॉर्नर (शहापूर) येथे पावसात भव्य कमानीवरील भगवा ध्वज कमानीसह खाली पडला. यावेळी आनंदवाडी येथील श्री. विशाल खर्गेकर या मावळ्याने पावसाची तमा न बाळगता भिजत झेंडा उचलला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्या मुलाचे गल्लीतील नागरिकांनी कौतूक केल आहे.
Belgaum Varta Belgaum Varta