Sunday , December 14 2025
Breaking News

आनंदनगर वडगाव भागात नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Spread the love

 

वडगाव : दुसरा क्रॉस आनंद नगर वडगाव या ठिकाणी नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड या ठिकाणी होत आहे, गेल्या आठ दिवसापासून आनंद नगर दुसरा क्रॉस येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे, आणि वाहणारे पाणी आजूबाजूच्या घरातील विहिरीमध्ये झिरपत असून विहिरींचे पाणी सुद्धा दूषित झाले आहे त्यामुळे वापरायची पाणी कुठून आणायचे हा प्रश्न येथील नागरिकासमोर उभा राहिला आहे. अनेक ठिकाणी गटारीला लागूनच सार्वजनिक नळ आहेत. या नळांना चाव्या नसल्यामुळे ड्रेनेजचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचून या नळातून मेन पाईपलाईनमध्ये हे ड्रेनेज पाणी शिरत असून हेच पाणी साई कॉलनीकडे व आनंदनगर दुसऱ्या क्रॉसकडे जात आहे. त्यामुळे हेच पाणी पिल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांना हिवताप, डेंग्यू, मलेरिया, संडास उलटी सारखे आजार होत आहेत. वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा ड्रेनेजचे पाणी बंद करण्यात आले नाही. सतत हे ड्रेनेचे पाणी उघड्या गटारीतून वाहत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक ठिकाणी हे ड्रेनेजचे पाणी खड्ड्यामध्ये साचून असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. हेच डास नागरिकांना चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तेव्हा महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकाना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे. अनेकांना संडास उलटीची बाधा झाल्याची येथील रहिवाशांची तक्रार आहे. अनेकांना डासामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवताप सारखे आजार उद्भवत आहेत. तेव्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन हे ड्रेनेज मिश्रित पाणी थांबवावे अशी येथील नागरिकांची मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष

आनंद नगर दुसऱ्या क्रॉसच्या नागरिकांनी वारंवार या ड्रेनेज पाण्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता करूया, बघूया अशी उडवा उडवीची उत्तरे ते देत आहेत, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे

वडगाव स्मशानभूमी जवळील ड्रेनेज चेंबर लिक

वडगाव स्मशानभूमी जवळील ड्रेनेजच्या चेंबर मधून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी आनंदनगर तिसऱ्या क्रॉसहुन दुसऱ्या क्रॉसकडे गटारीतून वाहत आहे. या ड्रेनेज मिश्रित पाण्यामुळे आजूबाजूच्या घरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नळाच्या पाईपलाईनमध्ये हे ड्रेनेज मिश्रित पाणी मिसळत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ नागरिकांची ही समस्या दूर करावी, अशी येथील नागरिकांकडून मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *