
बेळगाव : महांतेश नगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी बेळगाव रेल्वे स्थानकावर जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव उपविभागाच्या प्रमुख राजयोगिनी बी. के. अंबिका यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माउंट आबू येथील ब्रह्मकुमारी मुख्यालयातून आलेल्या बी. के. अच्युत यांनी तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणांमा विषयी माहिती दिली.बेळगाव रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक अनिल कुमार यांनीही समायोचित विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सीपीआय संजय कारेकर व रेल्वे स्थानकाचे पीएसआय व्यंकटेश यांनीही तंबाखू विरोधी दिन विषयी माहिती दिली.
आरोग्य खात्याचे शिवप्रकाश बेनगल यांनी ब्रह्मकुमारींचे कार्य व्यसनमुक्तीच्या दिशेने नेणारे आहे असे सांगितले. सुनील मैत्री, डॉक्टर व्रुंदा, राजयोगनी बी. के. सुलोचना, बी. के. मीनाक्षी, बी. के. वीणा, बी. के. साधना, बी. के. दत्तात्रय, बी. के. राजेंद्र घोटाडकी, बी. के. कामत, बी. के. शिवलीला, बी. के. संपत्ती आधी यावेळी उपस्थित होते. बी. के. शोभा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बी. के. श्रीकांत यांनी स्वागत केले. बी. के. सुरेश यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta