Wednesday , December 10 2025
Breaking News

काँग्रेसने सशर्त गॅरंटी दिल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : काँग्रेसने सशर्त गॅरंटी दिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगावात आज आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने विनाशर्त पाच गॅरंटी जाहीर केल्या होत्या. मात्र सत्तेवर येताच या गॅरंटीना अटी लागू केल्या असा आरोप करत याच्या निषेधार्थ भाजपने बेळगावात आज निदर्शने केली.

शहरातील चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून भाजप नेते व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. फ्लो
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले की, काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आता अटीशर्ती घालून देत आहे. हे जनतेच्या विरोधात आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव वाढवले होते, मात्र आज काँग्रेस दुधाचे दर 1.50 रुपयांनी कमी करून शेतकरी विरोधी धोरण अवलंबत आहे. गोवंश हत्याबंदी कायदा मागे घेण्याबाबत पशुसंवर्धन मंत्र्यांच्या विधानावर बोलताना आमच्या सुदैवाने ते पशुसंवर्धन मंत्री काय म्हणाले असते? जर ते मानव संसाधन मंत्री असते तर काय केले असते कोण जाणे अशी खिल्ली उडवली. त्यांनी दिलेल्या हमींवर लोकांचा विश्वास उडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून आम्ही आंदोलन करून इशारा देत आहोत असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, कर्नाटकातील जनतेची फसवणूक करून जनतेशी खोटे बोलून काँग्रेसने सरकार स्थापन केले आणि आता जनतेला दिलेल्या हमी अति घालून जनतेला देत आहेत. लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर यायचे आणि नंतर खरा रंग दाखवायचा हे काँग्रेसचे जुने धोरण आहे. भाजपने कोणतीही फसवणूक न करता लोकांची मने जिंकण्याचे काम केले आहे. काँग्रेसला आम्ही योग्य धडा शिकवू असा इशारा दिला. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांच्यामध्ये पाकिस्तान झिंदाबादचा नारा देणारे कार्यकर्ते आहेत, यावरून त्यांची मानसिकता काय आहे, हे दिसून येते. हे सर्व थांबवण्यासाठी जनता आणि भाजप कायमच विरोध करतील. पुन्हा असा प्रकार घडला तर त्याचे परिणाम वेगळे होतील.

यानंतर अपर जिल्हाधिकारी शांतला यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, डॉक्टर रवी पाटील, भाजप चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश नेर्ली, राज्य कार्यकारिणी सदस्या उज्वला बडवाण्णाचे, लीना टोपन्नावर यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष; सुवर्णसौधला भाजपचा घेराव घालण्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत भाजप नेत्यांनी प्रचंड निदर्शने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *