बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने शेख सेंट्रल स्कुलच्या विद्यमाने आज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा अनोखा उपक्रम राबविला. आझमनगर ते डी-मार्ट दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रत्स्यावरून दररोज शेकडोंच्या संख्येने वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते. हि बाब लक्षात घेऊन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी आसपास परिसरात पसरलेले प्लास्टिक जमा करून खड्डे बुजवून शेख सेंट्रल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आगळा वेगळा उपक्रम राबविला.
Belgaum Varta Belgaum Varta