बेळगाव : नियती फौंडेशनतर्फे गरजुंना नेहमीच मदतीचा हात दिला जातो. यावर्षी देखील एका होतकरू विद्यार्थी समर्थ नवलेला बीकॉम.च्या अभ्यासक्रमासाठी नियती फौंडेशनतर्फे आर्थिक मदत करण्यात आली आहे. सदर युवक गरीब कुटुंबातील आहे. त्याची शिक्षण घेण्याची धडपड पाहून नियती फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत व डॉ. समीर सरनोबत यांनी मदतीचा हात दिला आहे.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, नियती फौंडेशन नेहमीच समाजउपयोगी कामे करत असते. आजपर्यंत अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत आली आहे. यापुढे देखील समाजकार्याचा वसा असाच चालू राहील.
यावेळी गरजू विद्यार्थ्याची आई सारिका नवले, डॉ. सोनाली सरनोबत, डॉ. समीर सरनोबत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta