बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावात बोगस डॉक्टरवर छापा टाकून त्याचा दवाखाना सील करण्यात आला. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश बी कोणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश कोणी आणि जिल्हा आयुष अधिकार्यांच्या पथकाने आज राजू एम. पाटील यांच्या दवाखान्यावर अचानक छापा टाकला. बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथे दवाखाना थाटून कोणत्याही कागदपत्राशिवाय तो रुग्णांवर औषधोपचार करत होता. केपीएमईचे आरोग्य निरीक्षक डॉक्टर श्रीकांत सुनधोळी आणि मंजुनाथ बिसनळ्ळी यांच्या पथकाने अचानक छापा टाकून तपासणी केली. त्यानंतर नोटीस बजावून क्लिनिक सील केले.
Belgaum Varta Belgaum Varta