बेळगाव : पतीने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश पेठ जुने बेळगांव येथील रहिवासी प्रमोदिनी संपत सोमनाचे यांचा मृत्यू झाला आहे.
मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या संपत शंकर सोमनाचे (वय ४७) याने आपल्याच पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत गंभीर जखमी केले होते.
जखमी अवस्थेत प्रमोदिनी यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा काहीच उपयोग न झाल्याने रविवारी (दि.११) त्यांचा मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर आरोपी पतीने पलायन केले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी मार्केट उपविभाग शहापूर पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमून आरोपी संपत शंकर सोमनाचे याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
याप्रकणी अधिक तपास सुरु असून शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta