Thursday , March 5 2026
Breaking News

रोटरीच्यावतीने बेळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेनुग्राम बेलगाम यांच्या वतीने शनिवार दिनांक 17 जून रोजी येथील ज्योती कॉलेज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, रोटरी वेणूग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना रामगुरवाडी म्हणाले, रोटरी वतीने विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात असतात. यावेळी प्रथमच वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष देऊन स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड बेंगलोर यांच्या सहकार्यातून बेळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात देशभरातील चाळीसहून अधिक नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमध्ये दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. रोजगार मेळाव्यात भाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.मेळाव्यात भाग घेऊ इच्छिणाऱ्या बेरोजगारांनी दिलेल्या https://forms.gle/NcNLsSapPgvt2h3KAअथवा https://forms.gle/9aBD4646dQNZ52D29 या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
त्याचबरोबर शनिवार दिनांक 17 जून रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत चालणाऱ्या मेळाव्या दरम्यान जागेवरही नाव नोंदणी केली जाईल. या मेळाव्यामधून बेळगाव जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एका बेरोजगार उमेदवाराला तीन कंपन्यांमध्ये मुलाखत देण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या बेरोजगारांना एक महिन्याच्या आत,कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील बेरोजगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही उमेश रामगुरवाडी यांनी केले. या प्रकल्पाचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कंपन्यांविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी निखिल चौगुले, डी बी पाटील आदी रोटरी सदस्य हे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *