बेळगाव : बेळगावचे माजी पोलीस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार यांची आता बेळगाव उत्तर विभाग आयजीपी अर्थात पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या पदावर असलेल्या आणि परिश्रमपूर्वक उत्तर विभाग सांभाळलेल्या आयजीपी एन. सतीश कुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
बेळ्ळारी येथून बी. एस. लोकेश कुमार (केएन -2005) यांची बेळगावचे आयजीपी म्हणून तातडीने नियुक्ती केली गेली आहे. साधी राहणी आणि लोकांची मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या नूतन आयजीपी लोकेश कुमार यांच्या नियुक्तीचे बेळगाव परिसरात स्वागत होत आहे. हुबळी -धारवाड शहराचे पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस आयुक्त असलेले रमण गुप्ता यांची बदली बेळगाव उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक पदी करण्यात आली होती.
मात्र आता तडकाफडकी त्यांची बदली बेंगलोर शहराच्या (पूर्व) अतिरिक्त पोलीस आयुक्त पदी करण्यात आली आहे. तेथील विद्यमान अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर यांची अन्यत्र बदली केली गेली आहे.
दरम्यान, बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांचीही बदली झाली असून त्यांची म्हैसूर दक्षिण विभागाचे पोलीस उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta