Thursday , March 5 2026
Breaking News

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात जागतिक योग दिन

Spread the love

 

बेळगाव : 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर येथे आर्ट ऑफ लिविंग चे सदस्य गोपाळकृष्ण, श्रीमती सेजल पत्रावळी त्यांचे सहकारी व विश्वभारत सेवा समिती शहापूर बेळगाव या संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रकाश नंदिहळी, प्राचार्या श्रीमती ममता पवार यांच्या उपस्थितीत योग कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती स्मिता मुतगेकर यांनी योग गुरूंचा परिचय करून दिला. व प्राध्यापिका धनश्री गाडे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
“करो योग रहो निरोग” या उक्तीप्रमाणे मुलांच्याकडून सूष्म व्यायामापासून ते प्राणायाम पर्यंत विविध प्रात्यक्षिके करून घेतली. समवेत संपूर्ण प्राध्यापक वर्गाने सुद्धा हिरीहरीने भाग घेत योगसाधना केली.
कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक के. एल. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व प्राध्यापक मयूर नागेनहट्टी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *