Thursday , December 11 2025
Breaking News

अनैतिक संबंधाची माहिती समजताच आईनं पोटच्या पोराचा केला खून

Spread the love

 

रायबाग पोलिसांची कारवाई

रायबाग : आईनेच मुलाचा खून करून नैसर्गिक मृत्यू भासवल्याचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले. रायबाग पोलिसांनी ही कारवाई केली. अनैतिक संबंधाची माहिती मुलाला समजल्याने त्या महिलेने नातेवाइकांच्या मदतीने मुलाचा खून केला होता.

महिन्याभरानंतर हा प्रकार उघडकीस आला. हरिप्रसाद संतोष भोसले (रा. रायबाग) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून सुधा ऊर्फ माधवी संतोष भोसले (रा. रायबाग) असे आईचे नाव आहे. याप्रकरणी तिच्यासह तिघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, रायबाग येथे संतोष भोसले हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांचे भांड्याचे दुकान आहे. सुधा भोसले हिचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मुलगा हरिप्रसादला समजली होती. त्यामुळे सुधाने त्याला जीवे मारण्याचा कट रचला. त्यासाठी वैशाली सुनील माने (रा. शिंगणापूर, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर), गौतम सुनील माने यांची मदत घेऊन हरिप्रसादचा २८ मे रोजी खून केला. खून केल्यानंतर मुलगा झोपलेल्या जागेवरून उठत नसल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले. मात्र, हरिप्रसाद अचानक मरण पावल्याचे समजल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्याचे वडील संतोष बाहेरगावी गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून महिन्याभरातच खुनाचा छडा लावला.
मुलाच्या खूनप्रकरणात आईने आपल्या नात्यातील सातजणांची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यातील तिघांना अटक केली असून, इतर संशयित पसार आहेत. घटनास्थळी गुरुवारी पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांनी भेट देऊन रायबाग पोलिस पथकाचे अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *