रायबाग : हारूगेरी इथं बुधवारी सकाळी साडेनऊचा सुमारास पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. रुक्मव्वा मलाप्पा उप्पार (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. किरकोळ वादातून हा थरार घडला आहे.
याबाबत हारूगेरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हारूगेरी येथील ईदगाहजवळ उप्पार परिवारासह राहत होता. मल्लाप्पा उप्पार हा काका लक्ष्मण यांना दत्तक गेला होता. काकाला दोन बायका असून त्यांना मुले नसल्याने पुतण्याला दत्तक घेतले होते. १३ गुंठे जमिनीचा दावा न्यायालयात चालू होता. लक्ष्मणच्या दुसऱ्या पत्नीशी मलाप्पा यांचा खटला सुरू होता. त्या खटल्यात तडजोड साडेसहा लाखात झाली होती. ती रक्क्म मल्लाप्पाने देऊ नये, म्हणून घरात रोज पती- पत्नीत भांडण होत होते.
बुधवारी सकाळी पत्नीला मल्लाप्पाने उठवले, ती उठली नाही. मुलांना शाळेला सोडून येऊन पुन्हा उठवण्याचा प्रयत्न मल्लाप्पाने केला पण पत्नी रागावल्याने मल्लाप्पा घराबाहेर जाऊन बसला. हारूगेरी पोलिसांना याची माहिती मिळताच मलाप्पाचा शोध घेण्यास सुरू केला. त्याला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशी केली असता सर्व माहिती पोलिसांना दिली. मल्लाप्पा याला दोन मुले असून हारूगेरी पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. गुरुवारी जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील, अथणीचे डीएसपी श्रीपाद जलदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी हारूगेरीचे पोलिस निरीक्षक रवींचंद्र एफ. व उपनिरीक्षक गिरीमाल उप्पारसह उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta