Friday , December 12 2025
Breaking News

बिजगर्णी गावातील रोजगार हमी महिलांचा श्री कलमेश्वर मंदिरासाठी स्तुत्य उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : बिजगर्णी येथील श्री कलमेश्वर मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावातील रोजगार योजनेच्या महिला वर्ग व गावातील ट्रॅक्टर ट्रॉली धारकांनी एकत्रितपणे येऊन श्रमदानातून गावच्या बाहेरील टेकडीवरील माती आणून मंदिराचे सपाटीकरण करण्यात आले.
गावची मंदिरं ही श्रद्धास्थाने असतात. गावच्या एकीतूनच असे सार्वजनिक कार्य घडू शकते श्री कलमेश्वर मंदिर लवकर पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली आहे.
चेअरमन वसंत अष्टेकर, श्रीरंग भास्कळ, डी. डी. मोरे, के. आर. भाष्कळ, विष्णू मोरे, यशवंत जाधव, प्रकाश भास्कर, बबन कांबळे, सुभाष पाटील, मोणापा भास्कर, लक्ष्मण भास्कर, विनोद खांडेकर इतर सहभागी झाले होते.
तसेच स्वच्छेने ट्रॅक्टर ट्रॉली धारक सागर कोळी, किरण भाष्कळ, गोपाळ पाटील, प्रवीण अष्टेकर, तानाजी पाटील, सूरज पाटील, केदारी पाटील, रामचंद्र हलकर्णीकर, बाळू मोरे यांनी श्रमदानातून गावच्या विधायक कार्यासाठी सहकार्य केले.
शेवटी वसंत अष्टेकर यांनी धन्यवाद दिले.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *