बेळगाव : 29 जून रोजी हुक्केरी येथील एका व्यक्तीला ज्याचे कोणीही नातेवाईक नव्हते आणि तो हुक्केरीच्या रस्त्यावर झोपत असे, त्याच्या एका पायाला गँगरीन झाला होता त्याला हुक्केरी पोलीस आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये काम करत असणाऱ्या सहकारी मित्रांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याचा 29 तारखेला मृत्यू झाला होता याची माहिती मिळताच आरोग्य अधिकार्यांनी माजी महापौर विजय मोरे यांना बोलावून घेतले त्या बेवारस व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्याची विनंती केली. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते ऍलन विजय मोरे, गंगाधर पाटील, सॅम्युअल रॉड्रिग्स व इतर काही जणांनी विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यावेळी हुक्केरी पोलिसही उपस्थित होते माजी महापौर विजय मोरे यांनी आरोग्य अधिकारी संजय डूमगोळ यांचे सतत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta