
बेळगाव : एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके अध्यक्षा मोलिषका पवार यांनी टेंगिनकेरा गल्ली येथील रिद्धी सिद्धी महिला मंडळाचे नुकतेच उद्घाटन केले.
यावेळी या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी त्यांनी मंडळाच्या फलकाचे अनावरण केले.
प्रारंभी स्वागतगीत गाण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला यावेळी नगरसेविका ज्योती कडोलकर, प्रज्ञा शिंदे तसेच रिद्धी सिद्धी महिला मंडळाच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या. तसेच यावेळी महिला मंडळाची नूतर कार्यकारणी ही नेमण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षा नलिनी मोहिते, उपाध्यक्ष लता राणे, खजिनदार रेश्मा देसाई, उपखजिनदार दीप्ती देसाई, सचिव स्मिता घसारी, उपसचिव प्रिया बैलाप्पागोळ यांना करण्यात आले. तर सदस्य सारिका देवजी, पूजा घसारी, ज्योती तहसीलदार यांना करण्यात आले. या प्रसंगी सूत्रसंचालन स्मिता घसारी यांनी केले तर दीप्ती देसाई यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम हा टेगिंनकेरा गल्लीतील कार्पोरेशन हॉलमध्ये पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta