कडोलकर गल्लीत फॅशन ट्रेंड्स ब्युटिकच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन
बेळगाव : महिलांनी स्वतःहून ठरवले तर, कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. घरदार सांभाळून स्वतःचे कौशल्यावर त्या पुढं येतात. याच उदाहरण आपणा समोर आहे. इतर महिलांनी खटावकर यांचा आदर्श घेऊन पुढं वाटचाल करावी, असे मत सुधा भातकांडे यांनी व्यक्त केले.
हिंडलग्यात कार्यरत असलेल्या फॅशन ट्रेंड्स ब्युटिकच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन कडोलकर गल्लीत मैत्री टॉवर येथे संपन्न झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी नगरसेविका माया कडोलकर, तारांगणच्या अध्यक्षा अरुणा गोजे पाटील, स्वाती खटावकर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले.
अल्पावधीतच अभूतपूर्व मिळालेल्या महिलांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या मागणीनुसार दुसरी शाखा सुरू केल्याचे संचालिका स्वाती खटावकर यांनी सांगितले.
आपल्या कार्यात कितीही अडचणी आल्या तरी, न डगमगता सातत्याने प्रयत्न केल्यास हमखास यश मिळतेच. त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपले उद्दिष्ट साध्य कार्यासाठी झटले पाहिजे, असे अरुणा गोजे पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या संस्थेत फॅशन डिझायनिंग, ब्युटिशियन, आरी वर्क, मेहंदी क्लास, साडी गोंडा लावणे असे क्लासेस सुरू राहणार आहेत. असे संचालिकांनी कळवले आहे. यावेळी संस्थेच्या हिंडलगा शाखेमधील अनेक प्रशिकषणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वास मानकर यांनी आभार मानले.
विजय खटावकर, वैभव खटावकर, ज्योती पाटील, नेहा घुगरटकर, रेखा पाटील, सी. प्रीती, प्रिया पाटील, साधना पाटील, कोमल तरळे, प्रगती कुंडेकर यासह असंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta