
चिक्कोडी : हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या मृतदेहाचे 9 भाग बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले आहेत.
खून इतका निर्दयपणे करण्यात आला की मृतदेहाचे 9 भाग करण्यात आले आहेत. दोन हात, दोन पाय, मांडीचे दोन भाग, डोके दोन भाग, पोट असे कापून मृतदेहाचे तुकडे तुकडे करून मारेकऱ्यांनी बोअरवेलमध्ये फेकून दिले.
खटकबावी गावच्या शेतात 30 फूट खोल बोअरवेलमध्ये मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बोअरवेलच्या 25 फूट खोलवर रक्ताने माखलेली साडी आणि टॉवेल आढळून आले. बोअरवेलमध्ये 30 फूट खोलीवर मृतदेहाचे 9 भाग सापडले.
जैन मुनींचे पार्थिव बेळगावला पाठवले
हत्या झालेल्या जैन मुनींचा मृतदेह खटकबावी येथून बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, आज बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून, उद्या हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमात अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार भाविकांनी केला आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी तक्रार आल्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात सापडलेले पुरावे गोळा करून माहिती गोळा करण्यात आली. त्याच दिवशी रात्री स्वामीजींच्या ओळखीची व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्याच व्यक्तीने खून केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी दिली.
मृतदेहाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी 500 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बेळगाव उत्तर विभागातील हुबळी, धारवाड नगर, उत्तर कन्नड जिल्ह्यातील कर्मचारी, एसडीआरएफ, एफएसएल, तसेच स्थानिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सहकार्य केले. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे देण्याचे जिल्हा अधीक्षकांनी टाळले.
Belgaum Varta Belgaum Varta