
सेंट्रल हायस्कूलमध्ये पालक मेळाव्यात मार्गदर्शन
बेळगाव : मराठी माध्यमाची मुले मुळातच हुशार आहेत. त्यांना थोड मार्गदर्शन केले तर ती अव्वल गुण मिळवतील. पालकांना एक विनंती आहे स्वतःच्या मुलाची तुलना इतराशी करु नका. पै पाहुण्यासमोर तर त्याचा पाणउतारा करण्याऐवजी त्याचे कौतुक करा. बघा मग तुमच्या मुलांमध्ये कसे बदल घडतात, असे मत सेंट्रल हायस्कूलमचे मुख्याध्यापक व्ही. एस. हसबे यांनी केले.
ते मंगळवार (दि.3) मराठा मंडळच्या सेंट्रल हायस्कूलमध्ये आयोजित पालक मेळाव्यात अध्यक्ष या नात्याने बोलत होते.
पालक मेळाव्यात उपस्थित पाहुण्याची ओळख बी. ए. पाटील यांनी करुन दिली. स्वागत भाषणा डी. टी. सावंत यांनी केले.
प्रमुख वक्ते सुरेश अष्टगी यांनी अभ्यासाला कंटाळा त्याच्या भविष्याला टाळा हे गीत विद्यार्थ्यांकडून वदवून घेतले. एनएमएमएस परीक्षेत महिन्याकाठी 1 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी आठवीतील विद्यार्थ्यांना आहे. या संधीचा सदुपयोग करुन घ्या, असे मत पालक प्रतिनिधी परशराम पालकर यांनी केले. अभियंता विनायक शिंदे यांनी गरीब मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थिक हातभार लावत मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. आठवीत शिकत असलेल्या मुलांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोरे यांनी केले. चौबारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta