बेळगाव : सध्या खुनाचे सत्र जिल्ह्यात सुरू आहे. आज आणखी एका दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे.
यमकनमर्डीजवळील मावनूर येथे पती पत्नीची हत्या करण्यात आली. गजेंद्र इराप्पा हुन्नुरी (60) आणि द्राक्षयणी गजेंद्र हुन्नूरी (45) अशी हत्या झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत.
याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta