बेळगाव : क्रेडाई या बांधकाम संघटनेच्या महिला विभागाच्या वतीने आठ जुलै रोजी बांधकाम कामगारांना पिण्याच्या पाण्याच्या स्टीलच्या बाटल्या भेट देण्यात आल्या. क्रेडाई सभासदांच्या सुरू असलेल्या विविध 18 कामांवर भेट देऊन त्यांनी 200 बाटल्यांचे वाटप केले. विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
श्री राधाकृष्ण डेव्हलपर्स यांच्या वतीने अनगोळ रोडवर सुरू असलेल्या श्री दत्त स्मृती या बांधकाम साईटवर सुद्धा त्यांनी भेट देऊन कामगारांना स्टीलच्या बाटल्यांचे वितरण केले. याप्रसंगी डेव्हलपर्स ग्रुपच्या वतीने अनंत लाड यांनी सर्व महिला सदस्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष श्री. दीपक गोजगेकर यांनी सुरू केलेल्या गो ग्रीन या उपक्रमाचा संदेश देण्यासाठी आणि कामगारांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात दीपा वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव करुणा हिरेमठ, आणि अनुराधा नाईक, चिन्मय बैलवाड, सारिका नाईक, अपर्णा गोजगेकर, सायली पाटील-अकणोजी, नीतू जवळकर संज्योती पाणारे, अमृता अकणोजी आणि नूरिया शेख या महिला सभासदांनी भाग घेतला. याबरोबरच वृक्ष लागवड ही करण्यात येत असून कामगारांनी प्लास्टिक बाटल्या किंवा प्लास्टिक डब्यांचा वापर करू नये ते आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते असे यावेळी बोलताना क्रेडाई अध्यक्षांनी सांगितले. याप्रसंगी धनश्री इंटरपाईजेसचे सुनील हावळ, विनय उचूकर याचबरोबर सौ. सविता सायनेकर व प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta