Thursday , March 5 2026
Breaking News

फुलबाग गल्ली येथील रहिवाशांना डेंगू प्रतिबंधक लस

Spread the love

 

बेळगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशन फुलबाग गल्ली येथील स्वराज्य महिला मंडळच्या वतीने फुलबाग गल्ली येथील रहिवाशांना डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

येथील फुलबाग गल्ली मधील महिला मंडळे युवक मंडळे तसेच अनेक एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते आणि येथील अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी डेंगू प्रतिबंधात्मक लस दिली.

पावसाळ्यात अवतीभवती पाणी साचले राहते यावर डासांचे पैदास मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे ही गरज ओळखून सुरक्षित राखण्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने सर्वांना डेंगू लस देण्यात आली आहे.

यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सदस्य तसेच गल्लीतील महिला युवती यांच्यासह प्रज्ञा शिंदे, सुमेधा परमेकर, रेणुका पाटील, सुप्रिया शिंदोळकर उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *