चिक्कोडी : हिरेकुडी जैनमुनी कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणातील दोन आरोपीना चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या पथकाने हिंडलगा कारागृहातून ताब्यात घेतले. चिकोडी तालुका रुग्णालयात सदर आरोपींची आरोग्य तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करून अधिक चौकशीसाठी आरोपींची १४ दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत.
चिकोडी तालुक्यातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराजांच्या ५ जुलै रोजी झालेल्या हत्येची अधिक चौकशी करण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी सकाळी चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या पथकाने बेळगावच्या हिंडलगा कारागृहातुन नारायण माळी आणि हसन दलायत या दोन आरोपीना ताब्यात घेतले.
पोलीस आरोपींना चिक्कोडी जेएमएफसी कोर्टात हजर करणार आहेत. पोलीस 14 दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत. दोन सीपीआय, एका डी आर पथकाच्या सुरक्षेत आरोपीना चिक्कोडीला रवाना करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta