बेळगाव : बेळगावमधील नामांकित भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटच्या वतीने बेळगावमधील शेअर मार्केट ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी मोतीलाल ओसवाल या शेअर मार्केटमधील नामांकित कंपनीच्या वतीने जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमास मोतीलाल ओसवाल या कंपनीचे सिनियर मॅनेजर नागेंद्र तसेच एव्हीपी हरीश नायक हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे संचालक आणि मोतीलाल ओसवाल कंपनीचे बेळगाव फ्रँचाइजी पार्टनर विजय सांबरेकर तसेच अभिजित मुरकुंबी यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्याख्याते हरीश नायक यांनी शेअर मार्केट संदर्भातील विविध विषयांवरील माहिती देत प्रत्येकाने शेअर मार्केटकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून, यासंदर्भातील संपूर्ण ज्ञान अवगत करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. तसेच शेअर मार्केट संदर्भात प्रत्येकाने कशापद्धतीने जागरूक राहावे, शेअर मार्केटमध्ये कशापद्धतीने गुंतवणूक करावी, यातील जोखीम आणि ट्रेडिंग टेक्निक्स अशा विविध विषयांवर देखील माहिती देण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta