Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव पोलीस आयुक्त पदी एस. एन. सिद्धरामाप्पा यांची वर्णी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तपदी एस एन सिद्धरामाप्पा यांची नियुक्ती करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. सिद्धरामाप्पा हे 2005सालच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत.

बेळगाव शहर पोलिस आयुक्त हे पद आय जी पी शी समान आहे असेही राज्य सरकारने बजावलेल्या आदेशात म्हटले आहे.

मागील महिन्यात पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या यांची बदली झाल्या पासून कुणाची वर्णी बेळगाव पोलीस आयुक्त पदी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

अखेर एस एन सिद्धरामाप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धरामाप्पा हे वरिष्ठ आय पी एस अधिकारी असून या अगोदर त्यांनी सी आय डी मध्ये सेवा बजावली होती.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *