बेळगाव : अशास्त्रीय पद्धतीने घातलेल्या गतिरोधकावरून पडून जखमी झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सोमवारी खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सावगाव रोड वरील अंगडी कॉलेज जवळ ही घटना घडली आहे
ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी (वय 27) राहणार बुधवार पेठ टिळकवाडी असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. बुधवार दिनांक 12 जुलै रोजी दुचाकीवरून कॉलेजला जात असताना चुकीच्या पद्धतीने घालण्यात आलेल्या गतिरोधकावरून पडून हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर लागलीच सदर विद्यार्थ्याला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता सोमवारी ऋषिकेश याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे स्थानकात या घटनेची नोंद झाली असून सिविल हॉस्पिटल मधील सभागृहात उत्तरियतपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ऋषिकेश हा सिविल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta