बेळगाव : शिवारात रोप लावणी करताना सापाने चावल्याने इसमाचा मृत्यू झाला. लक्ष्मण सोमान्ना घुमठे (वय 60, राहणार छत्रपती शिवाजी महाराज चौक बसुर्ते बेळगाव) असे या सर्पदंशाने मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारी ही घटना घडली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
लक्ष्मण हे शेतात भात लावणी करण्यासाठी गेले होते. रोप लावणी करताना दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांना सर्प दंश झाला. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा काहीही उपयोग झाला नाही.
Belgaum Varta Belgaum Varta