बेळगाव : बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयात शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कराड येथील व्याख्याते संभाजीराव मोहिते यांचे ‘विशेष व्याख्यान,’ आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी दि. 22 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजक साप्ताहिक राष्ट्रवीर, मराठा समाज सुधारणा मंडळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि तुकाराम को ऑप बँक आहेत.
शनिवारी दुपारी 2:30 वाजता भाऊराव काकतकर कॉलेज मधील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रास्तविक आणि स्वागत प्रा. आनंद मेणसे, पाहुण्याचा परिचय प्रा. विक्रम पाटील, अध्यक्षीय समारोप वकील राजाभाऊ पाटील तर आभार गुणवंत पाटील करणार आहेत.
या कार्यक्रमाचे राजश्री शाहू महाराज आणि साहित्यिक अभ्यासक संभाजीराव मोहिते यांचा परिचय खालील प्रमाणे आहे.
परिचय पत्र
• ऍडव्होकेट मेडिएटर संभाजीराव हणमंतराव मोहिते शिरगांव ता. कराड जि सातारा येथे शेतकरी कुटुंबात जन्म..
• शिक्षण बी. ए. एल एल एम. एम. एम. एम. विद्यापीठांच्या पदव्या प्राप्त.
• शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, भारती विद्यापीठ पुणे, पूणे विद्यापीठ, अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ १९८६ पासून वकिली व्यवसाय
• सन २००५ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या तज्ञ समिती वरील सदस्य म्हणून कार्यरत
• ग्रामीण भारतातील पहिल्या वैकल्पिक वाद निवारण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष
• १९९२ पासून विविध महाविद्यालये व विद्यापीठाचे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत.
• सन २०१२ ते २०१५ पर्यंत अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता
• द कराड अर्बन को -ऑप. बँक कराडचे विद्यमान संचालक
• स्वातंत्र्य सैनिक श्री गजाननराव बंडोजी पाटील विद्यानिकेतन शिरगांव ता. कराड चे संस्थापक
• विजय दिवस समारोह समिती कराड चे सचिव • कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे सदस्य
• कराड नगरपरिषद कराडचे स्वच्छता दूत ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ यांचे चरित्र अभ्यासक
• आजवर २५ हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कायदेविषयक परिषदांमध्ये सहभाग
व्याख्याते म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आजवर विविध विषयांवर १२०० हुन अधिक व्याख्याने
विषय:- १) राजर्षी छत्रपती शाहू महाराज, २) संत गाडगेबाबा मानवतेचा परिस, ३) समाजकारणी यशवंतराव चव्हाण, ४) लोकनेते बाळासाहेब देसाई, ५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर काल आज आणि उद्या, ६) मला भेटलेली माणसं, ७) मराठीतील निवडक कविता, ८) चला देश घडवुया, ९) युवक आणि समाजकारण, (१०) मराठी माती आणि संत साहित्य आदी विषय
पुरस्कार
१) प्रितिसंगम कृतज्ञता गौरव पुरस्कार २००९
२) जागृती गौरव पुरस्कार २०१०
३) सेवारत पुरस्कार २०११
४) समाजभूषण गणपतराव देसाई स्मृती पुरस्कार २०१२
५) महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार २०१३
६) कराड गौरव पुरस्कार २०१५ (पी. डी. पाटील प्रतिष्ठान कराड)
७) मेडिएशन मर्चिल योगदानाबद्दल इंडियन मर्चंट चेंबर संस्था चर्चगेट मुंबईतर्फे सेवा सम्मान २०१५.
Belgaum Varta Belgaum Varta